भुसावळ : प्रतिनिधी
खडका गावात दिव्यांग व्यक्तीस शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १२ ऑक्टोबर रोजी खडका येथे संशयित आरोपींच्या घरासमोरील रस्त्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण बाळू धांडे (वय ५०, रा. खडका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी राजेंद्र शालीग्राम कोळी, सुरज राजेंद्र कोळी आणि सरला राजेंद्र कोळी (सर्व रा. खडका) यांनी धांडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सुरज कोळी याने हातातील फायटरने फिर्यादीच्या डोळ्याखाली मारहाण केली, तर अन्य दोघांनी हाताने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. मनोज येऊलकर करीत आहेत.


