जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे २३०० लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी उमेश पाटील व शिपाई रामेश्वर चव्हाण असे दोन कर्मचारी कर्तव्यावर आहेत .
वसंतवाडी प्लाट भाग वार्ड १मध्ये मोरोती मंदीरासमोरील चौकात बऱ्याच दिवसांपासून गावात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन वरील वाल लिक होते त्यामुळे पाण्याची नासाडी होऊन पुढे कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता या विषयी त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांना लिकेज संदर्भात माहिती दिली याची दखल घेत सरपंच विनोद पाटील यांनी ग्रामसेवक बबन वाघ यांना सदर लिकेज वाल बदलून नवीन वाल बसविण्याची सुचना केली.ग्रामसेवक यांनी त्यासाठी लागणारे साहित्य पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांला घेऊन दिल्यानंतर साधारण दिड ते दोन महिने झाले तरी पाणी पुरवठा कर्मचारी सरपंच व ग्रामसेवक यांनी वेळोवेळी तोंडी सुचना करुनही काम करत नाही त्याची मुजोरी लक्षात आल्यानंतर आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी ग्रामसेवक बबन वाघ स्वतः सरपंच विनोद पाटील शिपाई रामेश्वर चव्हाण सागर ठोसरे व दिपक चिमणकारे यांना सोबत घेऊन वाल लिकेजचे काम पुर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत केला.
मिळालेल्या माहितीनुसार या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांला दोनदा लेखी सुचेना देखील देण्यात आल्या आहेत तरी देखील सदर कर्मचारी ऐकत नाही शेवटी या मुजोर कर्मचाऱ्यांमुळे ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर स्वतः काम करण्याची वेळ आली


