जळगाव : प्रतिनिधी
मोबाईलमधील व्हॉटस्अॅपची सेटिंग ‘अॅटो डाऊनलोड’वर असताना एपीके फाईल डाऊनलोड आणि झाली जळगावातील व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल चार लाख ६४ हजार ४३९ रुपये गायब झाले. हा प्रकार ९ ऑक्टोबर रोजी घडला.
नीलेश सराफ यांच्या बँक खात्यातून पाच ते सहा ट्रान्झेक्शन झाले व १० ते १५ मिनिटात ही रक्कम गायब झाली. मोबाईल गरम झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफ यांनी मोबाईल पाहिला असता त्यांना पैसे काढल्याचे मेसेज आलेले दिसले. तसेच ४० ते ५० ओटीपीदेखील आलेले होते. सराफ यांची वॉशिंग मशीन खराब झाल्याने त्यांनी कस्टमर केअरला कॉल केला होता. त्यानंतर कर्मचारी येऊन मशीनची दुरुस्ती करून गेले होते. त्यासाठी आलेले ओटीपी संबंधितांना दिले व दरुस्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र त्यानंतर हा प्रकार घडला.
व्हाट्सअॅपवर काही फोटो, मेसेज अथवा काही व्हिडिओ आल्यास वायफायवर ‘अॅटो डाऊनलोड’ व्हावे म्हणून अनेक जण व्हॉट्सअँपची सेटिंग ‘अॅटो डाऊनलोड’ ठेवत असतात. मात्र केव्हा कोणती फाईल येईल व ती डाऊनलोड झाल्यास किती नुकसान होऊ शकते, हे सांगता येत नाही. त्यामुळे वायफायवर ‘अॅटो डाऊनलोड’ सेटिंग टाळावी असे म्हणणे आहे.


