Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तूरीच्या पिकात केली गांजाची लागवड मात्र पोलिसांनी केला पर्दाफाश !
    क्राईम

    तूरीच्या पिकात केली गांजाची लागवड मात्र पोलिसांनी केला पर्दाफाश !

    editor deskBy editor deskOctober 10, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दोन एकरावर तूरीच्या पिकात गांजाची लागवड करणाऱ्यांचा रावेर पोलिसांनी पर्दाफाश केला. ही कारवाई रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रावरे तालुक्यातील मोरव्हेल शिवारात केली. याठिकाणाहून सुमार १७ लाख रुपये किंमतीचे १७१ किलो वजनाची गांजाची (कॅनबिस वनस्पती) लागवड उद्ध्वस्त केली आहे. या प्रकरणी एका संशयितावर आरोपीवर एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल हे दि. ८ रोजी गावात पायी गस्तीसाठी निघाले असताना त्यांना दोन तरुण संशयितरित्या बसलेले आढळून आले. दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन जात विचारपूस केली असता एकाच्या मोबाईलमध्ये गांजाची शेती असलेले फोटो दिसले. त्यांनी याबाबत अधिक तपास केला असता मोरव्हाल येथील युसुफ अकबर तडवी (वय ५०) या याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार आणि फॉरेन्सिक पथकाने सकाळी शेतात छापा टाकला.

    संशयित युसुफ तडवी याने आपल्या दोन एकर शेतीत तुरीच्या पिकाच्या मधोमध स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारी कॅनबिस वनस्पती (गांजा) सदृश अंमली पदार्थाची लागवड केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीत एकूण १७१ किलो वजनाची १७२ लहान-मोठी गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.

    यांनी केली कारवाई
    ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोउपनिरी तुषार पाटील, पोउपनिरी मनोज महाजन, गुन्हे शोध पथकातील पोना कल्पेश आमोदकर, पोकों प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, राहुल परदेशी, योगेश पाटील, पाल दुरक्षेत्रचे पोहेकॉ ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, ईस्माईल तडवी, गजाजन बोणे, कुंदन नागमल आणि चालक गोपाळ पाटील यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.