जळगाव : प्रतिनिधी
स्वतःचा जीव देण्यासह तुझ्या भावाला मारेल, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीला फोनवर बोलण्यास भाग पाडण्यासह तिच्यासोबत बळजबरीने फोटो काढून विनयभंग केला. ही घटना जून महिन्यापासून सुरू होती. याप्रकरणी प्रदीप उर्फ बंटी विनोद राठोड (रा. रामदेववाडी, ता. जळगाव याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात पोक्सोंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय मुलीशी प्रदीप राठोड याने मैत्री केली. नंतर जीव देण्यासह तिच्या भावाला मारण्याची धमकी देत फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेला एका महाविद्यालयाबाहेर भेटून तिच्यासोबत बळजबरीने फोटो काढून विनयभंग केला. पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर दि. ७ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दाखल फिर्यादीवरून प्रदीप राठोड याच्याविरुद्ध पोक्सोंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.


