जळगाव : प्रतिनिधी
आज जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पद्मालय महीला प्रभाग संघातील म्हसावद बोरणार प्रभागातील श्री स्वामी समर्थ ग्रामसंघ वसंतवाडी यांच्या माध्यमातून चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप करण्यात आला होता त्या बचतगटाच्या महिलांनी वसंतवाडी व जळके बस स्थानक याठिकाणी शॉपिंगगाळे भाडेतत्त्वावर घेऊन आपल्या व्यवसायाला आज जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या हस्ते फित कापुन सुरुवात केली.
यात आदर्श समुहातुन सौ.सोनाली नरेंद्र पाटील यांना चहा फरसाण उपहारगृहासाठी , शिवकृपा समुहातील सौ.सोनाली लक्ष्मण पाटील यांना पाणी पुरी स्टाॅलसाठी , आदर्श समुहातील सौ.अनिता धनराज पाटील साडी विक्री सेंटरसाठी, उडान स्वयंसहाय्यता समुहातील सौ.कविता सोनवणे यांना शिवणकामसाठी तर सत्यमेव जयते समुहातील सौ.सरला संजय दांडगे फुटवेअर विक्री अशा वेगवेगळ्या व्यवसायासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये उपजीविकेसाठी निधी प्राप्त करून देण्यात आल्याची माहिती रविंद्र सुर्यवंशी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापक यांनी दिली.
यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजु लोखंडे, जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरला पाटील,प्रभाग समन्वयक जळगाव दिनेश न्हाळदे , स्वप्नील पाटील पंचायत समिती जळगाव, सरुबाई जाधव वावडदा, कल्पना ठोंबरे विटनेर,विद्या पाटील पाथरी ,मालुबाई पाटील वसंतवाडी, मोनिका पाटील जळके,रपेशा पाटील वडली या सर्व C.R.P.तसेच साधना सपके वसंतवाडी बॅक सखी , मनिषा पाटील वडली पशुसखी, वैशाली घाडगे विटनेर पशुसखी,विजया पाटील वावडदा कृषी सखी, तसेच जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश पाटील, जळगाव जिल्हा शिवसेना (शिंदे गट)शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष पि.के.पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, ग्रामसेवक बबन वाघ ,सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील व मोठ्या संख्येने बचत गट महीला व गावातील नागरिक उपस्थित होते


