धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री.सुरेश सोनवणे हे आठवड्यातून अनेक वेळेस दारु पिऊन शाळेत येतच नाहीत पर्यायी शाळेतील विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागते.
आज दि.६ आक्टोबर रोजी तर “शिक्षक दारु पिऊन मस्त आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण नाही स्वस्त” या संदर्भात विद्यार्थ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे.ही एक वेळची समस्या नसून याअगोदर ही वृतपात्रात या शाळेतील प्रकार उघडकीस आला आहे. परंतु यावर ठोस निर्णय होत नाही किंबहुना कवठळ येथील शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे तरि कवठळ येथील पालकांनी जर यावर ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर सर्व पालकवर्ग मुलांना दुसऱ्या शाळेत नाईलाजास्तव प्रवेश करावा लागेल.दिवाळीपूवीच मुलांना सुट्टी लागली आहे काय? अशे मत कवठळ ग्रामस्थ उपस्थित करत आहेत किंवा लवकरात लवकर नवीन शिक्षकाला रुजू करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.


