नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज खळबळजनक घटना घडली आहे. भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यासमोर एका वकिलाने कोर्टरूममध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्नही केला असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला ताबडतोब ताब्यात घेतले.
पोलीस त्यांना बाहेर काढत असताना, वकिलाने सांगितले की, “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” दरम्यान, संपूर्ण घटनेत न्यायमूर्ती गवई शांत राहिले आणि न्यायालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहिले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि न्यायालयाच्या आवारात सुरक्षा वाढवली.
या घटनेवर एका वकिलाने प्रतिक्रिया देखील दिली आहे. वकिलाने, “आजची घटना खूप दुःखद आहे. जर एखाद्या वकिलाने कोर्टावर, विशेषतः कोर्टरूममध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. पहा, तो आमच्या बारचा सदस्य आहे.” आम्ही नुकतीच चौकशी केली आणि तो २०११ पासूनचा सदस्य असल्याचे आढळले.”असे त्यांनी म्हटले आहे
वकिलाने त्याच्या निवेदनात म्हटले आहे की, “ही एक अतिशय दुःखद घटना आहे. म्हणून, आपण असे म्हणू शकतो की जे आढळून आले आहे ते म्हणजे माननीय सरन्यायाधीशांनी भगवान विष्णूच्या प्रकरणांमध्ये केलेल्या टिप्पणीवर त्यांनी हा प्रयत्न केला (वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला). ही एक अतिशय दुःखद घटना आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि जर ही घटना खरी असेल तर कारवाई केली पाहिजे. CJI B.R. Gavai।


