मुंबई : वृत्तसंस्था
भाजप व ठाकरेंच्या नेत्यांमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असतान आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप हा काही पक्ष नाही ती देश लुटणारी टोळी आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार कंजूस आहेत. त्यांनी पूरग्रस्त शेतकर्यांना मदत जाहीर करणे अपेक्षित होते;पण त्यांनी शेतकरी प्रश्नावर कानात बोळा घातला आहे. गौतम अदानी यांना मुंबई विकत आहेत, ते कमिशन वरील मुख्यमंत्री आहेत, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले, मृत्युपत्र कोणी केले व सही कोणाची घेतली याबाबत माहिती घ्यावी, अशी मागणी रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे या मेळाव्यात केली होती. रामदास कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, रामदास कदम हा माणूस कधीच विश्वास ठेवण्यास पात्र नव्हता. पक्ष सोडून गेलेली माणसं कधीच बाळासाहेब ठाकरे याच्याशी एकनिष्ठ राहून त्यांना दैवत मानू शकत नाही. मी शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेब ठाकरे तिकडे होतो. पद आणि पैसा यांच्याबाबत एखादी व्यक्ती खालच्या स्तराला जातो याचे उदाहरण आहे. उद्धव ठाकरे यांचा फोटोच्या त्यांनी पाया पडले पाहिजे. कारण त्यांनी कदम यांना दोन वेळेस विधानपरिषद जाण्याची संधी दिली. पक्षाचा विरोध असताना हा निर्णय घेण्यात आला होता. आजपर्यंत ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत विधाने केली त्या सर्वांना जबर किंमत मोजावी लागली आहे. आज अनिल परब १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, ते ऐका, असे आवाहनही त्यांनी केले.
आम्ही मराठी माणसासाठी एकत्रित येत आहोत . मुबई, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकासंदर्भात आमच्या बैठका सुरू आहेत, असे सांगत वंचित बहजुन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भूमिका संघ आणि भाजपा ला मदत होईल अशी असते, असा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.
पुणे प्रशासन तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतले. पुणे प्रशासन तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतले आहे,पुणे पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी याने नेमले आहे. ते टोळी प्रमुख यांच्यासाठी काम करत आहेत, असा आरोपही राऊत यांनी केली.


