जळगाव : प्रतिनिधी
विजयादशमीनिमित्त संध्याकाळी आई बाहेर गेलेली असताना बेरोजगारीला कंटाळून सुरेंद्र रामसिंग चौधरी (३३, रा. राधाकृष्णनगर) या तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) राधाकृष्णनगरात घडली. उपचार सुरू असताना रात्री ११ वाजता तरुणाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहिती नुसार, सुरेंद्र चौधरी हा आईसोबत राधाकृष्ण नगरात राहत होता. नोकरी, काम नसल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होता. गुरुवारी संध्याकाळी घरी एकटा असताने त्याने स्वतःला पेटवून घेतले. पेटत्या अवस्थेत ते आरडाओरड करत घराबाहेर रस्त्यावर पळत सुटला. काही तरुणांनी आग विझवून त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली.


