यावल : प्रतिनिधी
येथील अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर दहिगाव फाट्याच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्तोल आणि जिवंत काढतोस खरेदी विक्री करताना दोघांना बुधवारी मध्यरात्री पकडण्यात आले होते. तर यावल येथील तरुणाने अमळनेर येथील एकास यापूर्वी दोन पिस्तोल विकले होते. तेव्हा या गुन्ह्यात अमळनेर येथून देखील एकास अटक करण्यात आली आहे. तर या गन्ह्यातील तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता तिघांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल शहरातील बोरावल गेटजवळील रहिवाशी युवराज उर्फ युवा राजू भास्कर (वय ३४) हा वराडसिम ता. भुसावळ येथील भूषण कैलास सपकाळे (वय ३१) याला गावठी बनावटीचे पिस्तोल विक्री करत असताना पोलिसांनी बुधवारी रात्री दोघांना पकडले होते. ही कारवाई अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर शहराच्या बाहेर दहिगाव फाट्याजवळ करण्यात आली होती. तर या दोघांना रविवारपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तेव्हा पोलिस कोठडीत चौकशी करतांना युवराज उर्फ युवा भास्कर याने अनिल मोहन चंडाले (वय ३५ रा. गांधलीपुरा, अमळनेर) याला देखील दोन गावठी बनावटीचे पिस्तोल विक्री केल्याची माहिती दिली. तेव्हा तरूणास यावल पोलिसांनी अटक केली आहे.
तर या तिघांना रविवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयातसह दिवाणी न्यायाधीश जी. आर. कालते यांच्या समोर हजर केले असते. तिघांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. तिघांची रवानगी भुसावळ येथील अतिरिक्त उपजिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.


