पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील मराठावाड्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचे थैमान सुरु असून आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये पाच दिवसांसाठी मध्यम पावसाचा इशारा देत पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे. यापैकी दोन जिल्ह्यांमध्ये – चंद्रपूर आणि यवतमाळ – गुरुवारी – ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पिवळा इशारा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दर्शवितो, तर ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देतो. आयएमडीच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान नागपूर, बुलढाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे.
पुढील काही तासांत यवतमाळ आणि वर्धा येथील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भातील नागपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुढील काही तासांत गोंदिया येथील काही ठिकाणी विजांसह वादळ आणि यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि अमरावती येथे ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असेही हवामान खात्याने वर्तवले आहे.


