Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाखांचा ऐवज जप्त !
    क्राईम

    गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाखांचा ऐवज जप्त !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 21, 2025Updated:July 21, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) काल रात्री (२० जुलै २०२५) केलेल्या धडक कारवाईत ८ किलो १३० ग्रॅम गांजासह दोन आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत ₹२,६२,९५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    वरीष्ठ पोलीसांचे आदेश
    जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव भाग) श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा उपविभाग) श्री. आण्णासाहेब घोलप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना अंमली पदार्थ विरोधी कारवाईबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.

    पोलीसांनी मिळाली गोपनिय माहिती
    २० जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार रवींद्र अभिमन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन व्यक्ती काळ्या रंगाच्या बजाज पल्सर मोटारसायकलवरून (MH१८ BW ८०३५) गलंगी गावाकडून चोपडा शहराकडे अवैधरित्या गांजासदृश अंमली पदार्थांची वाहतूक करत आहेत. या माहितीवरून पोहवा विष्णू बिऱ्हाडे, रवींद्र पाटील व दीपक माळी यांनी गलंगी गावात पाळत ठेवली. त्याचवेळी, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे आणि पोहवा विलेश सोनवणे यांनी चोपडा शहरात आरोपी येत असलेल्या रस्त्यावर नाकाबंदी लावली.

    अशी केली कारवाई
    आरोपींना गलंगी गावात पोलिसांची पाळत असल्याचे लक्षात येताच, ते भरधाव वेगाने मोटारसायकलने चोपडा शहराकडे निघाले. बिऱ्हाडे, पाटील व माळी यांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु आरोपींचा वेग जास्त असल्याने त्यांनी तात्काळ ही माहिती पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांना दिली. वल्टे यांनी विलेश सोनवणे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोपडा शहरात नाकाबंदी लावून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोटारसायकलवर मागे बसलेला एक इसम उडी मारून पळून गेला. मात्र, पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांनी सुमारे १५० ते २०० मीटर धावत त्याचा पाठलाग करून त्याला पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले.

    असा केला मुद्देमाल जप्त
    या कारवाईत ९० हजार किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल १ लाख २१ हजार ९५० किमतीचा ८ किलो १३०ग्रॅम वजनाचा गांजा, तसेच ५१ हजार किमतीचे २ मोबाईल असा एकूण  २ लाख  ६२ हजार ९५० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशन करत आहे.

    यांनी केली कारवाई
    ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक मधुकर साळवे (चोपडा शहर), सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे (चोपडा शहर), पोउपनिरी जितेंद्र वल्टे, पोहवा विष्णू बिऱ्हाडे, रवी पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, चालक दीपक चौधरी (सर्व स्थानिक गुन्हे शाखा), आणि पोकाँ मदन पावरा, महेंद्र पाटील, अतुल मोरे (सर्व चोपडा शहर पोलीस स्टेशन) यांच्या पथकाने केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.