Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी शिवसेना सज्ज : पालकमंत्री गुलाबराव पाटील
    धरणगाव

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी शिवसेना सज्ज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMay 30, 2022No Comments5 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगावात शिवसेनेचा मेळावा उत्साहात : आगामी निवडणुकांसाठी फुंकले रणशिंग

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव येथील श्रीजी जिनींगच्या परिसरात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आयोेजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. तर ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केले त्या भाजपच्या खासदारांनी आपल्या विरोधात उमेदवार दिल्याचे सांगत याचे योग्य वेळी उत्तर दिले जाईल असा इशारा देखील दिला. आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेची जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यात मजबूत स्थिती असून आगामी कालखंडातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्षाला चांगले यश लाभणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. तर गद्दारांना धडा शिकवण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी याप्रसंगी दिला.

    शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत धरणगाव येथील श्रीजी जिनींग परिसरात शनिवारी सायंकाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर यांनी धरणगाव तालुक्यातील संघटना बांधणी, झालेली विकास कामे व बुथरचना बाबत विस्तृत माहिती विषद केली. तसेच सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील सर यांनीकेले तर आभार उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी मानले.

    यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत , वक्ते गजानन चव्हाण, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मुंबईचे निरीक्षक प्रशांत सातपुते, सुमित बने, संतोष चांदे, शांताराम बने, जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जीवन आप्पा बयास, भरत महाजन, अभिजित पाटील, युवासेनेचे तालुका प्रमुख चेतन पाटील, उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, पंचायत समितीचे सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, उपतालुका प्रमुख मोतीअप्पा पाटील, राजेंद्र ठाकरे, डी. ओ. पाटील, मुकुंदराव नन्नवरे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, तत्कालीन नगराध्यक्ष निलेश चौधरी, महिला पदाधिकारी माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, तालुका प्रमुख जनाआक्का पाटील, रत्नाबाई धनगर, अंजली विसावे, हेमांगी अग्निहोत्री, धिरेंद्र पुर्भे, रविंद्र चव्हाण सर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अक्षय मुथा, किशोर पाटील, सर्व नगरसेवक, तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निराधार आरोपांना तात्काळ उत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करून धरणगाव नगरपालिकेवर झेंडा फडकणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही पक्षाला यश मिळणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

    शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी अतिशय भावपूर्ण असे भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे फक्त शिवसेनाप्रमुख नसून ते एखाद्या कुटुंबप्रमुखासारखे व संवेदनशील मुख्यमंत्री कसे आहेत याची उदाहरणे देत त्यांनी विविध लोकल्याणकारी योजनांना लागू करण्याची माहिती दिली तेव्हा अनेकांना गहिवरून आले. उध्दवजी हे मातृहृदयी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

    याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगाव तालुक्यात शिवसेनेची अतिशय मजबूत स्थिती आहे. जिल्ह्यातील पहिला आमदार येथूनच मिळाला असून सुमारे २५ वर्षांपासून येथे शिवसेनेचा आमदार आहे. येथूनच १९९६ साली जिल्ह्यातील पहिला नगराध्यक्ष निवडून देण्याचा बहुमान मिळाला आहे. आजही तालुक्यातील जास्तीत जास्त सरपंच, पंचायत समिती आदींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. आज जिल्ह्यात शिवसेनेचे ५ आमदार व ५ पंचायत समिती सभापती असून झेडपीचे १५ सदस्य आहेत. आगामी काळात पूर्ण शक्ती पणाला लाऊन जिल्हा परिषदेवर भगवा फडकावणे अशक्य नसल्याचे पालकमंत्री म्हणाले. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तर याप्रसंगी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करून त्यांनी देवांना सुध्दा पक्षीय राजकारणात वाटून घेतल्याचा टोला मारला.

    पालकमंत्री पुढे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असून आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. या निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज राहण्याची गरज आहे. शिवसेनेने आजवर आपण सर्वांना भरपूर दिले असून आता आपण पक्षाला देण्याची वेळ आली असल्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी खासदार यांना निवडून आणण्यासाठी आपण जीवाचे रान केले असतांनाही त्यांनी आपल्या विरोधात उमेदवार दिल्याबद्दल घणाघाती टीका केली. खासदारांनी केलेल्या दगाफटक्याचे योग्य वेळी उत्तर दिले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. तर शिवसेनेच्या ध्येयधोरणांची माहिती आणि विशेष करून राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. तर प्रत्येक गावाच्या वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावल्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात. शेत पाणंद रस्त्यांमुळे शेतकर्‍यांचे आपल्याला आशीर्वाद लाभले आहेत. जि.प. सुरक्षा भिंती अनेक योजनांच्या यशस्वी कार्यान्वयनातून जिल्ह्यात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. यात मुस्लीम समाज सुध्दा या विकासाभिमुख वाटचालीत आपल्या सोबत असून आपण धरणगावातून मुस्लीम कार्यकर्त्याला लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आणल्याचे प्रतिपादन ना. पाटील यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी त्यांनी सलीम पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर आगामी निवडणुकांमध्ये काही गद्दार हे विंचवाप्रमाणे काम करत असून त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नसल्याचा इशारा देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिला. शिवसैनिकांनी एकसंघ राहून पक्षाचा प्रचार-प्रसार करतांनाच आपला कुणी अपप्रचार करत असेल तर त्यांना जोरदार उत्तर द्या असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील सर यांनी केले तर आभार उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.