जळगाव : प्रतिनिधी
शहरातील समतानगर भागातील २० वर्षीय सागर अशोक नन्नवरे या तरुणाचा सोमवारी झोपेतच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे कि, सागर नन्नवरे हा पेंटिंगचे काम करत होता. रविवारी रात्री तो नेहमीप्रमाणे जेवण करून झोपला. सकाळी त्याची आई सुनीता नन्नवरे कामावर गेल्यानंतर सागर झोपेतून उठला. त्याने गल्लीत चक्कर मारली आणि काही मित्रांसोबत वेळ घालवला. त्यानंतर तो पुन्हा घरी येऊन झोपी गेला. सोमवारी सकाळी १० वाजता सुनीता नन्नवरे कामावरून घरी आल्या. मुलाला कामाला उशीर होत असल्याचे सांगत त्यांनी सागरला उठविले मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. सागरच्या मित्रांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून सागरला मृत घोषित केले.


