जळगाव : प्रतिनिधी
बसस्थानक परिसरातून मोबाइल लांबविणाऱ्या शेख इम्रान शेख गुफरान (रा. गुलशननगर मालेगाव) याला अटक करून त्याच्याकडून चोरीचे चार मोबाइल हस्तगत करण्यात आले. त्याचा मालेगाव येथील साथीदार सोनू हा पळून गेला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नवीन बसस्थानक परिसरातून चोरी झालेल्या मोबाइलचा शोध घेण्याच्या सूचना जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी पोहेकॉ नरेश सोनवणे, पोहेकॉ मिलिंद सोनवणे, पोकों राहुल पाटील, नरेंद्र दिवेकर यांना दिल्या होत्या. पोलिसांचे पथक बसस्थानक परिसरात गेले असता दोन संशयितांनी पोलिसांना पाहून पळ काढला. रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर शेख इम्रान शेख गुफरान याला पकडले. चोरट्याकडे सापडलेल्या चार मोबाइलबाबत त्यास विचारपूस केली असता पळून गेलेला त्याचा साथीदार सोनू (रा. मालेगाव) याच्यासह बसस्थानकातून मोबाइल चोरल्याचे त्याने सांगितले.


