चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील अडावद येथून जवळ असलेल्या वर्डी येथून अवैधपणे ओला गांजाची विक्री करणाऱ्या तरूणावर अडावद पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून १ लाख ४ हजारांचा ओला गांजा जप्त केला करुन अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील वर्डी गावातून एक तरूण अवैधपणे गांजाची चोरटी विक्री करत असल्याची गोपनिय माहिती अडावद पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी २८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करुन संशयित सुनील उर्फ तिसमाऱ्या जगन बारेला (वय १९, रा. वर्डी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ४ हजार रूपये किंमतीचा ५ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी हवालदार संजय धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुनील बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात करत आहेत.


