Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मद्यपी मुलाचा पित्यानेच काढला काटा : तिघांना पोलिसांनी केली अटक !
    क्राईम

    मद्यपी मुलाचा पित्यानेच काढला काटा : तिघांना पोलिसांनी केली अटक !

    editor deskBy editor deskJune 23, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मद्यपी मुलाकडून कुटुंबियांना सातत्याने शिविगाळ व मारहाण होत असल्याने त्यास कंटाळून पित्यानेच मुलाच्या डोक्यात भला मोठा दगड टाकून त्याचा खून केला तर भावासह काकाने मृतदेहाची विल्हेवाट मदत केल्याचा प्रकार फत्तेपूर पोलिस ठाणे हद्दीत घडला. सुरूवातीला अनोळखी वाटणार्‍या पुरूषाची ओळख पटल्यानंतर संयुक्त तपासात खुनाचा प्रकार उघड होवून तिघांना बेड्या ठोकण्यात यंत्रणेला यश आले.

    सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीत कसबापिंप्री ते पिंपळगांव चौखांबे रस्त्यावर रविवार, 22 जून रोजी रोजी सकाळी सात वाजतात अनोळखीचा मृतदेह आढळला. घातपाताचा प्रकार लक्षात घेता पोलिसांनी ओळख पटवण्यावर भर दिला. मयत हा कसबा पिंप्री गावातीलच राहणार असल्याची व शुभम धनराज सुरळकर असल्याची ओळख पटताच पोलिसांचे पथक मयताच्या घरी धडकले. मृताचे व त्याच्या परिवाराचे काही दिवसांपासून खटके उडाल्याचे व त्यातून पत्नी माहेरी निघून गेल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता खोलीतील चटईवर रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांनी ही चटई तपासार्थ ताब्यात घेत मृताचे वडील धनराज सुपडु सुरळकर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

    मुलगा शुभम हा नेहमी घरी दारु पिऊन आल्यानंतर घरातील आम्हा सर्वांना विनाकारण शिविगाळ, मारहाण करत असे. त्याच्या या वागण्यामुळे त्याची पत्नीदेखील त्याला सोडून गेली. मृताचा त्रास होऊ लागल्याने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला व रात्री आम्ही सगळे झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातल्याने तो जागीच मरण पावला व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुसरा मुलगा गौरव धनराज सुरळकर तसेच माझा मोठा भाऊ हिरालाल सुपडु सुरळकर यांना बोलावून स्वतःच्या वाहनातून पिंपळगाव चौखांवे रोडवर मृतदेह टाकल्याची कबुली धनराज सुरळकर यांनी दिल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.

    हा गुन्हा जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार विनोद पाटील, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक राहुल पाटील, नाईक हेमंत पाटील, कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, कॉन्स्टेबल राहुल महाजन, कॉन्स्टेबल भूषण पाटील, चालक हवालदार भरत पाटील, दर्शन ढाकणे आदींच्या पथाकने केली. तपास सहा.पोलिस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.