एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील कासोदा येथील सुतार गल्लीमध्ये राहणाऱ्या समाधान संतोष वाघ (वय ३२) या युवकाने १६ रोजी रात्री जेवण केल्यानंतर रात्री गळफास घेतल्याची घटना सकाळी ९ वाजता उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान वाघ यांचा चुलत भाऊ प्रकाश बाळू वाघ हे समाधान यांच्याकडे मोबाईलचे चार्जर घेण्यासाठी गेले असता समाधान याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. या नंतर समाधान याला प्राथमिक उपचारासाठी तत्काळ एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपास कासोदा येथील स.पो. नि. नीलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनात श्रीकांत गायकवाड व राकेश खोंडे करत आहेत.


