Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण
    चाळीसगाव

    शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण

    editor deskBy editor deskJune 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील हातले येथे  आज दिनांक 13 जुन 2025 रोजी सामाजिक सभागृह, हातले येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार चव्हाण यांनी विविध प्रशासकीय विभागांनी शासकीय योजनांची माहिती देणे,लाभार्थ्यांना थेट लाभ देणे यासाठी लावलेल्या स्टॉलची पाहणी केली व उपस्थित अधिकारी – कर्मचारी यांना लोकाभिमुख काम करण्याच्या सूचना दिल्या. समाधान शिबिरे आयोजित करण्यामागची शासनाची भूमिका स्पष्ट करत, शासनाने लोकाभिमुख राज्यकारभाराचे आदर्श उदाहरण असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू केलेली ही शिबिरे म्हणजे शासन,प्रशासन नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा व प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न असून, सर्व नागरिकांनी सर्व विभागांच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनापासून काम करून शासनाचा उद्देश सफल करावा अशी सूचना देखील आमदार चव्हाण यांनी केली.
    यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, माजी जि प सदस्य पोपटतात्या भोळे, राजुभाऊ राठोड, शेषरावबापू पाटील, माजी पं.स.सभापती संजयतात्या पाटील, भाजपा मंडल अध्यक्ष डॉ.महेंद्रसिंग राठोड, माजी पं.स. सदस्य सतीश पाटे, सुभाषदादा पाटील, भगवान परदेशी, राहुल पाटील, किशोर परदेशी, योगेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व नायब तहसीलदार,सर्व मंडळ अधिकारी,सर्व ग्राम महसूल अधिकारी ,महसूल सेवक उपस्थित होते. या शिबिरामध्ये सर्व तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. सर्व लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे,लाभांचे वाटप करण्यात आले.यावेळी आरोग्य विभागाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजीत केले होते.

    सदर शिबिरात खालील सर्व विभागांचे मिळून एकूण 979 लाभ विविध लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहेत.

     

    कृषी विभाग – राज्य पुरस्कृत कृषी यांत्रीकीकरण योजनांतर्गत ₹१ लक्ष अनुदान ०३ ट्रँक्टर वाटप

    संजय गांधी योजना DBT प्रक्रिया करणे लाभार्थी-१०२

    आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतलेले लाभार्थी -२५८

    तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे मार्फत दिलेल्या सेवा-८९

    पुरवठा शाखा -शिधापत्रिका लाभ-१२४

    सेतू केंद्रमार्फत दिलेले लाभ –
    उत्पन्न दाखले-७४
    जातीचे दाखले-३७
    वय अधिवास व रहिवास दाखले-६४

    ग्रामपंचायत विभाग जॉब कार्ड-२९

    जननी सुरक्षा योजना लाभ-१७

    लेक लाडकी योजना-०६

    ICDS योजना-०७

    ग्रा प मार्फ़त वजनकाटा वाटप-०१

    बांधकाम कामगार साहीत्य वाटप-०२

    मोफत पुस्तके वाटप-८९

    सार्वजनिक बांधकाम विभाग भुमीपुजन-०३

    शेतक-यांना शेतकरी सुलभ योजनाओं जिवंत सातबारा मोहीम लाभ-२२

    तुकडा शेरा कमी करणे मोहीम-५२

    एकूण एकंदर विभागामार्फत दिलेले लाभ- ९७९

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025

    किराण्यासाठी पैसे काढायला गेलेल्या माजी पोलिसांची फसवणूक; एटीएममध्ये कार्ड अदलाबदल

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.