Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्र्यांची भेट : ठाकरे बंधू एकत्र येणार ? कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल !
    राजकारण

    मुख्यमंत्र्यांची भेट : ठाकरे बंधू एकत्र येणार ? कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल !

    editor deskBy editor deskJune 13, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने यात अचानक ट्विस्ट आला. यावर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास भाजपला परवडणार नाही. त्यामुळे त्यांना एकत्र येऊ द्यायचे नाही असे भाजपने ठरवल्याचे या भेटीगाठीवरून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

    “ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणाचे आम्ही स्वागत केले होते. कुटुंब एकत्र येणार असेल तर त्याला आमचे समर्थन होते. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट राजकीय होती की वैयक्तिक होती याची माहिती आपल्याला नाही. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणे भाजपला परवडणारे नव्हते. त्यामुळे ते भाजपला होऊ द्यायचे नाही”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

    ईडीची भीती दाखवून राज ठाकरे यांना दूर केले जाईल ही शंकाही व्यक्त होत होती. मात्र या भेटीगाठीने राज ठाकरे यांच्यावरच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. परंतु उद्धव ठाकरे सेना आणि मनसे युती होणार नाही अशी खेळी खेळली जात असल्याची शंका वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आता दोन भावांच्या युतीबाबत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.