जळगाव : प्रतिनिधी
वीज मीटर बदलण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना भूषण शालिग्राम चौधरी (३७) या कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (१० जून) पकडले.
सविस्तर वृत्त असे कि, ४६ वर्षीय तक्रारदाराच्या राहत्या घराचे वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावावर होते. ते बदलण्यासाठी प्रभात कॉलनी कक्षातील वायरमन भूषण चौधरी हा तीन दिवसांपूर्वी तक्रारदाराच्या घरी गेला होता. त्यावेळी तुम्ही मीटरमध्ये छेडछाड केली असल्याने तुम्हाला दंड होईल व वीजचोरीचा गुन्हा दाखल होईल, असे सांगितले, तसेच हा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वीज मीटर टेस्टिंगचा सकारात्मक रिपोर्ट देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. याविषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.


