Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात ३०२ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
    चोपडा

    छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात ३०२ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

    editor deskBy editor deskMay 26, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव दि. २६ (जिमाका वृत्तसेवा)

    चोपडा तालुक्यातील मौजे वैजापूर येथे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन विश्रामगृह परिसरात करण्यात आले होते. शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

    या शिबिराचे अध्यक्षस्थान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी भूषविले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार श्री. भाऊसाहेब थोरात, प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अण्णासाहेब घोलप, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या शिबिरात एकूण ३०२ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये सामूहिक वनहक्क पट्टे वाटप – १५, घरकुलासाठी मोफत रेती परवाना – २, उत्पन्न प्रमाणपत्र – २७, जातीचे प्रमाणपत्र – ८, रहिवासी प्रमाणपत्र – १०, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मंजुरी – ४७, ॲग्री स्टॅक योजना नोंदणी – १०, पीएम किसान योजना लाभ – ५, कौटुंबिक वाटणी पत्र – १, आधार नोंदणी/दुरुस्ती – ५, संजय गांधी योजना निवडपत्र – ३, इंदिरा गांधी योजना निवडपत्र – ५, कुटुंब अर्थसहाय्य योजना – १, ई-शिधापत्रिका वाटप – १६, धान्य वाटप – ५, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना लाभ – १५, धरती जन आबा योजनेअंतर्गत शिधापत्रिका – ३, शिधापत्रिकेत नाव समावेश/वगळणे – ११, केवायसी (पुरवठा विभाग) – ५, वैद्यकीय कारणासाठी दाखला – ४, साडी वाटप – ३, प्रधानमंत्री आवास योजना मंजुरी – १०, शबरी आवास योजना मंजुरी – १, पीएम आवास अनुदान वाटप – १७, शबरी आवास अनुदान वाटप – ५, आयुष्मान कार्ड – ५, शिष्यवृत्ती वाटप (शिक्षण विभाग) – २० आणि आदिवासी आश्रमशाळा दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण – ३० यांचा समावेश होता.

    या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना थेट शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे आदिवासी भागातील जनतेचा शासनव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय !

    November 18, 2025

    खळबळजनक : मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे रुळावर आढळला तरुणाचा मृतदेह !

    November 18, 2025

    जळगावात ५२ वर्षीय प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय !

    November 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.