Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वनविभागाची मोठी कारवाई : लाखो रुपयांचे अवैध लाकूड केले जप्त !
    कृषी

    वनविभागाची मोठी कारवाई : लाखो रुपयांचे अवैध लाकूड केले जप्त !

    editor deskBy editor deskMay 6, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रावेर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सुमारे 5.73 लाख रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई रावेर-चोरवड मार्गावर मौजे लोणी गावाजवळ करण्यात आली.

    दिनांक 5 मे 2025 रोजी गस्तीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रावेर-चोरवड रस्त्यावर संशयित वाहने अडवण्यात आली. यात MH04CU5418 क्रमांकाचा आयशर ट्रक व MH19Z7862 क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आले. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता पंचरास जातीचे एकूण 31 घनमीटर लाकूड आढळून आले.

    एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 5,73,400 रुपये इतकी होते. सदर गुन्हा हा मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घडलेला असल्याने रावेर वनविभागाने तत्काळ मध्य प्रदेश वनविभागाशी संपर्क साधून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले.  या कारवाईत जप्त केलेली दोन्ही वाहने व लाकूडसाठा पुढील कार्यवाहीसाठी खालील मध्य प्रदेश वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले:

    1. युनुस दाऊदी, वनपाल  2. आर. डी. काजळे, वनरक्षक 3. वीरेंद्र कुमार, वनरक्षक ही कारवाई नीनू सोमराज, वनसंरक्षक (प्रा.), वनवृत्त धुळे; श्री. जमीर  शेख, उपवनसंरक्षक, यावल; श्री. आर. आर. सदगीर, विभागीय वन अधिकारी (दक्षता), धुळे; व श्री. समाधान पाटील, सहा. वनसंरक्षक, यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर मोहिमेत वनपाल श्री. अरविंद धोबी (सहस्त्रलिंग), वनरक्षक आयेशा पिंजारी (अहिरवाडी), सविता वाघ (पाडले खु.), जगदीश जगदाळे (जुनोना), वनमजूर सुभाष माळी आणि वाहनचालक विनोद पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांना दिलासा; लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाइन

    January 24, 2026

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण तापले; आणखी कारवाईची शक्यता

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.