Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » म्यानमारच्या भूकंपामध्ये मोठा विध्वंस !
    क्राईम

    म्यानमारच्या भूकंपामध्ये मोठा विध्वंस !

    editor deskBy editor deskMarch 29, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    म्यानमार आणि थायलंड देशात झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. एकट्या म्यानमारमध्ये भूकंपात ६९४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक बेपत्ता आहेत. या भूकंपात आतापर्यंत १५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. दुसरीकडे, थायलंडमध्ये भूकंपामुळे सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. या अचानक आलेल्या आपत्तीनंतर म्यानमारमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या भयानक भूकंपाने म्यानमारसह शेजारील देशही हादरले आहेत. आज सकाळी अफगाणीस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले. भारत, चीन आणि नेपाळसह सहा देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

    शुक्रवारी म्यानमार आणि थायलंड हे दोन्ही देश ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरले. दिवसभरात एकामागून एक चार भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर म्यानमारमध्ये पुन्हा एकदा रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. शुक्रवारी रात्री १२ वा. च्या सुमारास ४.२ तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. भूकंपाचा सर्वाधिक फटका थायलंडमधील बँकॉकला बसला आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, बँकॉकमधील एक ३० मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली ९० मजूर गाडले गेले. म्यानमारमध्ये अनेक ठिकाणी या भूकंपात रस्ते उखडले गेले. घरे आणि अपार्टमेंट कोसळल्या. त्यात हजारो लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत म्यानमारमध्ये ६९४ मृतदेह सापडले तर थायलंडमध्ये १० मृतदेह सापडले आहेत. दोन्ही देशात मिळून सुमारे १५०० जणांवर उपचार सुरू आहेत. दोन्ही देशांच्या आपत्कालीन सेवेच्या अधिकाऱ्यांनी आणखी शेकडो जण मृत्युमुखी पडले असावेत, अशी भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, आज सकाळी ५.१६ वाजता अफगाणिस्तानात ही ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.

    या भूकंपामुळे थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी बँकॉकमध्ये आणीबाणी जाहीर केली. काही मेट्रो आणि लाईट रेल्वेसेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या, ज्यामुळे बँकॉकची वाहतूक व्यवस्था अधिक बिघडली.

    पहिला भूकंप सकाळी ११:५० वाजता झाला, त्याची तीव्रता ७.२ इतकी होती. यानंतर, दुसरा भूकंप दुपारी १२:०२ वाजता आला, त्याची तीव्रता ७ इतकी होती. त्यानंतर, प्रत्येकी एक तासाच्या अंतराने आणखी दोन भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, पहिल्या दोन भूकंपांचे केंद्र जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होते, तर तिसरा भूकंप जमिनीखाली २२.५ किलोमीटर खोलीवर झाला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात !

    April 11, 2026

    महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात !

    April 11, 2026

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरा

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.