Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात भरधाव डंपरने सायकलस्वाराला चिरडले !
    क्राईम

    धरणगावात भरधाव डंपरने सायकलस्वाराला चिरडले !

    editor deskBy editor deskMarch 7, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिल्याने सायकलस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. जळगाव रोडवर असलेल्या महावीर जिनिंगच्या समोरच हा भीषण अपघात झाला. बांभोरी ते धरणगाव दरम्यान या चालकाने बेदरकारपणे डंपर चालवून अनेक वाहनांना कट मारले. हे सर्व भयभीत वाहनचालकांना पुढे आल्यावर हा अपघात दिसला.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील रहिवासी दत्तात्रय शंकर पाटील (वय-65) हे जिनिंग मध्ये रात्रपाळी वाचमन म्हणून काम करतात. आज गुरूवारी रात्री 7.30 वाजता ते धरणगाव कडून जिनिंग मध्ये कामासाठी सायकल वरून जात होते. याच वेळी जळगाव कडून वाळूने भरलेला डंपर (MH04/FJ8083) भरधाव वेगाने आला आणि सायकलस्वारला धडक दिली. अपघात एवढा भिषण होता की सायकल आणि सायकलस्वाराला 500 मीटर पर्यंत फरफटत नेले. या अपघातात सायकलस्वार दत्तात्रय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मागून येणारे माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, प्रतिक जैन, स्वप्नील भोलाणे यांनी मृत दत्तात्रय पाटील यांना ओळखले आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. शिवसैनिक पाटील यांनी जखमी दत्तात्रय पाटील यांना आपल्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

    मृत दत्तात्रय पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन असा परिवार आहे. समाजीक कार्यरत नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या दत्तात्रय पाटील यांच्या अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच ग्रामीण रुग्णालय परिसरात प्रचंड मोठा जमाव जमला. डंपर वाळूने भरलेला असून चालक फरार आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिली. मृत दत्तात्रय पाटील हे एसटी चालक समाधान पाटील यांचे वडील होत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.