Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवारांनी मंत्री मुंडेंच राजीनामा घ्यावा : दमानियांची पुन्हा मागणी !
    राजकारण

    अजित पवारांनी मंत्री मुंडेंच राजीनामा घ्यावा : दमानियांची पुन्हा मागणी !

    editor deskBy editor deskFebruary 17, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील बीड येथील सरपंच खून प्रकरण चर्चेत असतांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे त्या म्हणाल्यात. आता राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय स्वतः मंत्रीच घेणार का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हाणला.

    बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण मुंडे यांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच योग्य तो निर्णय घेतील असे नमूद करत ही मागणी धुडकावून लावली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

    अंजली दमानिया सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोणत्याही स्थितीत घेतला पाहिजे. तुम्ही जर म्हणत असाल की हे मंत्री ठरवेल, तर हा अक्षरशः मूर्खपणा आहे. असेच असेल तर तुम्ही सगळ्या यंत्रणा बंद करा. पोलिस यंत्रणा व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागही बंद करा.

    एक मंत्री ठरवेल की आपल्या भागात किती दहशत पसरवणार? किती पैसे खाणार? किती लोकांना त्रास देणार? कसा छळ करणार? हे सर्व मंत्री ठरवणार. कहर म्हणजे राजीनामा द्यायचा की नाही हे सुद्धा आता मंत्रीच ठरवेल. मुख्यमंत्री किंवा पक्ष ठरवणार नाही का? आम्ही वेडी माणसे आहोत का? असा उद्विग्न प्रश्न दमानिया यांनी यावेळी अजित पवारांवर टीका करताना केली.

    दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महबूब शेख यांनी भाजप आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे हे जय – विरू असून, त्यांचा दोस्ताना फार जुना असल्याचा दावा केला आहे. सुरेश धसांनी देशमुख हत्याकांडाप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर ‘आकाचे आका’ म्हणत टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांचा राजीनामाही मागितला होता. पण आता त्यांनीच धनंजय मुंडेंची भेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेख यांनी त्यांच्यावर ही टीका केली आहे.

    महबूब शेख यासंबंधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, सुरेश धस व धनंजय मुंडे यांच्या भेटीत काहीही नवल नाही. त्यांचा दोस्ताना फार जुना आहे. यापूर्वीही अनेकदा त्याचा प्रत्यय आला आहे. धस व मुंडे ही जय – विरूची जोडी आहे. त्यांची भेट व्हॅलेंटाईनला झाली की कधी हे मला माहिती नाही. पण त्यांचे दोन समाजात तेढ निर्माण करायचे व पुन्हा भेटायचे असे धोरण आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरेश धस, अभिमन्यू पवार व नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची गरज होती. पण हे तिघेही कुणाच्या तरी सांगण्यावरून बोलत असण्याची शक्यता आहे. या तिघांचा आका कोण आहे? हे शोधावे लागेल.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    छत्रपती चौकात भाजपची जंगी सभा; नगराध्यक्षपदासाठी प्रतिभा चव्हाण मैदानात

    November 17, 2025

    राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका !

    November 17, 2025

    संकट मोचकाच्या तथाकथित हनुमानाची भुसावळच्या विजुभाऊची सुपारी यावलमध्ये फेल

    November 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.