Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात प्रौढने घरातच घेतला गळफास
    क्राईम

    जळगावात प्रौढने घरातच घेतला गळफास

    editor deskBy editor deskJanuary 30, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पत्नी आणि मुलगा कामावर असताना विलास रूपचंद इंगळे (वय ५५, रा. वाल्मीक नगर) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, विलास इंगळे हे सेंट्रिंग काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांची पत्नी स्वयंपाकाच्या कामाला गेल्या होत्या, तर मुलगा रिक्षामध्ये प्रवाशांना सोडण्यासाठी गेला होता. त्यामुळे इंगळे हे घरी एकटेच होते. विलास इंगळे यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी इंगळे यांच्या मुलाला माहिती दिली. त्याने घराकडे धाव घेतली असता वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने इंगळे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.