Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिसांचे वाहन गस्तीवर असताना दोघांवर गुन्हा दाखल !
    क्राईम

    पोलिसांचे वाहन गस्तीवर असताना दोघांवर गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskJanuary 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील देऊळगाव येथे फत्तेपूर पोलिसांचे वाहन गस्तीवर असताना बुधवारी मध्यरात्री १च्या सुमारास त्यांना देऊळगाव गुजरी (ता. जामनेर) येथे विनाक्रमांकाचे वाहन आढळून आले. चालकाशेजारील दोघांना उतरवून चौकशी करीत असताना चालकाने वाहन धामणगाव बढेकडे पळवून नेल्याचा प्रकार घडला.

    मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार मुकेश शालीग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री ११च्या सुमारास पोलिस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त घालत असताना मध्यरात्री १च्या सुमारास देऊळगाव गुजरी येथे संशयित वाहन आढळून आले. चालकाशेजारी बसलेले शेख मुजम्मिल शेख रफिक कुरेशी (२७, माळीखेल, कुरेशी वाडा, बुलढाणा) व रहीम शाहा रहेमान शाहा (४४, बऱ्हाणपूर रोड, जळगाव, मूळ रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद) यांना खाली उतरवून चौकशी करीत असताना चालकाने वाहनासह पळ काढला. दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तसेच ते रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने वाहनातून फिरताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.