Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोरीच्या बकऱ्या विकत घेणाऱ्याला ठोकल्या पोलिसांनी बेड्या !
    क्राईम

    चोरीच्या बकऱ्या विकत घेणाऱ्याला ठोकल्या पोलिसांनी बेड्या !

    editor deskBy editor deskDecember 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील मेहुणबारे तालुक्यातील दहिवद व खडकीसिम येथून तब्बल १६ बकऱ्या चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चोरट्याने ज्याला कमी दरात बकऱ्या विक्री केल्या होत्या, त्याच्या मुसक्या आवळल्या. हुसेन समशुभाई खाटीक (हांडेवाडी फाटा मंजूर, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब युवराज पवार (दहिवद) यांच्या एकूण ५३ हजार रुपये किमतीच्या ५ बकऱ्या व प्रवीण तुळशीराम पाटील (खडकीसिम) यांच्या ८९ हजार रुपये किमतीच्या एकूण ११ बकऱ्या रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरी नेल्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला संबंधित शेतकऱ्यांनी बकऱ्या चोरीच्या फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    या गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणून बकऱ्या चोरी करणारा मुख्य आरोपीचे नाव शोधून काढले. या चोराकडून बकऱ्या विकत घेणारा संशयित हुसेन समशुभाई खाटीक (हांडेवाडी फाटा मंजूर, ता. कोपरगांव, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने कमी किमतीमध्ये बकऱ्या विकत घेतल्याची कबली दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.