Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण
    क्राईम

    खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

    editor deskBy editor deskDecember 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    कर्ज वसुलीसाठी दुचाकीने जाणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला संशयित दुचाकीस्वारांनी अडवले. त्याच्याकडून २५ हजाराची रक्कम, दुचाकी व मोबाइल हिसकावून घेत मारहाण केली. ही घटना जामनेर- पहूर रस्त्यावर मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास नेरी येथील पेट्रोल पंपाजवळ घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल शेकन्ना मेकला (२६, रा. शिव कॉलनी, जळगाव) हे देवपिंप्री व पहूर येथे कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसूल करण्यासाठी व कर्जाची रक्कम वाटपासाठी जळगाव येथून सकाळी ६ वाजता निघाले. सकाळी ७ वाजेच्या सुमारास नेरी येथून पुढे जात असताना पेट्रोल पंपाजवळ समोरून दुचाकीवर तोंडाला कापड बांधून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले.

    त्यातील एकाने मेकला यांचे हात पकडले व दुस-याने त्यांच्या खिशातील २५ हजार व मोबाईल काढून घेतला. दोघांपैकी एकाने मेकला यांच्या दुचाकीवर बसून पळ काढला व दुसरा त्याने आणलेल्या दुचाकीवरून पळून गेला. घाबरलेल्या अवस्थेतील अमोल मेकला यांनी चालत देवपिंप्री गाठले व फायनान्स कंपनीच्या वरिष्ठांना माहिती दिली. मेकला यांच्याकडील २५ हजार रोख, ३० हजारांची दुचाकी व ५ हजाराचा मोबाईल असा ६० हजाराचा ऐवज लांबविल्याप्रकरणी अनोळखी दोन इसमांविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026

    वाकोद परिसरातील महामार्गावर भरधाव ट्रक पलटला !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.