Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शार्टसर्कीटमुळे वेल्हाळा शिवारात ७ एकरातील ऊस जळून खाक
    भुसावळ

    शार्टसर्कीटमुळे वेल्हाळा शिवारात ७ एकरातील ऊस जळून खाक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शेतशिवारातील ७ एकरातील ऊस जळून खाक झाल्यामुळे ३ शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. आगीत साधारण १० लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ऊसतोडणीचा हंगाम चालू होण्याची लगबग असतांनाच या संकटामुळे पुन्हा परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, महावितरणचे धनंजय धांडे, कविता सोनवणे तर तलाठी बाळासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.


    शॉर्ट सर्किटमुळं आग लागून १० एकर ऊस जळाल्याची घटना वेल्हाळा या गावात घडली आहे. ऊसाच्या तोडणीची लगबग सुरू झालेली असतानाच आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आणि आशाबाई श्रीधर पाटील (गट ११२), रेशमी भूषण राणे (गट ११३), मधुकर चौधरी (गट ११४) यांच्या शेतातील इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. त्यामुळे बघता बघता ७ एकरातील ऊस जळून खाक झाला. जोरदार वाऱ्यामुळे आग अधिक पसरली. आजू बाजूच्या शेतकऱ्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळं आग अधिक पसरत होती. आणि हा हा म्हणता आगीचे लोण परिसरात पसरू लागल्याने गावकऱ्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. परंतू तोपर्यंत बघता बघता ७ एकरवरील ऊस जळून खाक झाला होता. या आगीत साधारण १० लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

    December 28, 2025

    साडेआठच्या सुमारास थरार; व्यापारी संकुलाजवळ गोळी झाडून आरोपी पसार !

    December 18, 2025

    भुसावळमध्ये दरोड्याचा कट फसला; गावठी पिस्तूलासह तिघे अटकेत !

    November 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.