Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत मोठी वाढ
    क्राईम

    मोठी बातमी : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत मोठी वाढ

    editor deskBy editor deskNovember 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचारात उतरले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतला आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चार फोर्स वनचे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो तैनात करण्यात येणार आहे.

    राज्यात भाजपच्या प्रचाराची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. या धामधुमीत त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात आला वाढ करण्यात आली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा फेर बदल करण्यात आला आहे. सध्या फोर्स १ मधील अत्याधुनिक शस्त्रधारी असलेले ४ कमांडो फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात येणार आहे. तर एकूण १८ जवान त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती एसआयडीच्या गोपनीय रिपोर्टपुढे आली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्यसभा रणभूमी: महायुती- महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी ताण वाढला

    February 25, 2026

    मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव; जरांगे पाटलांकडून उपोषणाचा इशारा !

    February 25, 2026

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.