Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिसांचा सिनेस्टाईल थरार : चोरलेली तार घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना पकडले !
    क्राईम

    पोलिसांचा सिनेस्टाईल थरार : चोरलेली तार घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना पकडले !

    editor deskBy editor deskOctober 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भादली वीज उपकेंद्राच्या परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास २० हजार रुपये किमतीची अॅल्युमिनियमची तार चोरी करून जाणाऱ्या रहीम खान रशीद खान, मोसीन शहा सिकंदर शहा, शाहरुख शहा सिकंदर शहा, अफजल खान उर्फ फावड्या रशीद खान (सर्व रा. तांबापुरा) या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

    मिळालेल्या माहितीनुसार, भादली वीज उपकेंद्राच्या परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास ९० हजार रुपये किंमतीची अॅल्युमिनियमची तार चोरी झाली होती. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरलेली तार घेऊन चोरटे जळगावकडे येत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. चोरटे अजिंठा चौफुलीकडून ईच्छादेवी चौफुलीकडे रिक्षातून तार घेवून जाताना दिसताच पथकाने त्यांचा पाठलाग करीत वरील रेकॉर्डवरील सराईत चौघं गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांनी भादली येथून चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तार जप्त करण्यात आली आहे.

    ही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, पोलिस नाईक प्रदीप चौधरी, किशोर पाटील, योगेश बारी, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, नाना तायडे, सिध्देश्वर डापकर यांनी केली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट इशारा

    March 6, 2026

    वऱ्हाडींच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; नववधूचे दागिने चोरून मध्यप्रदेशात पळाले, दोघांना बेड्या

    March 6, 2026

    धक्कादायक : तरुणीचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू !

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.