Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : महाविकास आघाडीत बिघाडी ? ठाकरे गट चर्चेला येणार नाही !
    राजकारण

    मोठी बातमी : महाविकास आघाडीत बिघाडी ? ठाकरे गट चर्चेला येणार नाही !

    editor deskBy editor deskOctober 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून महाविकास आघाडी नेहमीच महायुतीच्या विरोधात तयारी करीत असली तरी सध्या याच महाविकास आघाडीत धुसफूस दिसून येत आहे. महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत मिळाले आहेत. जागा वाटपाबाबत आघाडीची सुरू असलेले चर्चा आता चांगलीच बिघडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जागा वाटपाच्या चर्चेला उपस्थित असतील तर ठाकरे गट चर्चेला येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इतकच नाही तर नाना पटोले यांची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखील केली असल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे.

    जागा वाटपात विदर्भातील जागांबाबत नाना पटोले हे अडवणूक करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा आणखीनच वाढला असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे नाना पटोले यांची तक्रार देखील केली आहे. त्यातच नाना पटोले या संदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे पोहोचले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागा वाटपाचा वाद कसा मिटतो, ते पहावे लागणार आहे.

    जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आज सकाळीच उद्धव ठाक गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली होती. यावेळी प्रतिक्रिया देतानाच त्यांनी आज जागा वाटपाचा निर्णय अंतिम होणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. इतकेच नाही तर काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना अधिकार नसतील तर राहुल गांधी यांच्याशी चर्चा करावी लागणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर झालेल्या जागा वाटपाच्या बैठकीत संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता नाना पटोले यांच्याशी चर्चा करणार नसल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.