Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी तयारीला लागण्याचे ठाकरेंचे आदेश
    जळगाव

    जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी तयारीला लागण्याचे ठाकरेंचे आदेश

    editor deskBy editor deskSeptember 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दि.२४ सप्टेंबर २०२४ वार मंगळवार रोजी जळगाव ग्रामीण चे पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन जळगाव ग्रामीण मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा केली.मविआ च्या सूत्रानुसार मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा संबंधित त्या त्या पक्षांना मिळणार असल्याने जळगाव ग्रामीण ची जागा निर्विवाद शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे.

    शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वात दोन्ही उपजिल्हाप्रमुख ॲड शरद माळी, भाऊसाहेब सोनवणे तसेच दोन्ही तालुकाप्रमुख जयदीप पाटील व उमेश पाटील,धरणगाव नगरीचे शहरप्रमुख भागवत आप्पा चौधरी,नगरसेवक जितेंद्र धनगर,जळगाव तालुक्यातील समन्वयक विजय लाड आदींनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे भेट घेतली.

    विधानसभेत इच्छूक उमेदवार सहसंपर्कप्रमुख गुलाबराव जी वाघ, जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, लक्ष्मण पाटील (लकी आण्णा) यावेळी बैठकीत उपस्थित होते. तिघांपैकी एक नाव चर्चा करून निश्चित करण्यात येणार आहे.आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष निश्चित विजयश्री प्राप्त करून भगवा फडकवेल असा आशावाद सर्वांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.