Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेंदुर्णीत दोन गटात हाणामारी ; पोलिसासह पाच जखमी
    क्राईम

    शेंदुर्णीत दोन गटात हाणामारी ; पोलिसासह पाच जखमी

    editor deskBy editor deskSeptember 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील शेंदुर्णी येथे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तरुणांमध्ये झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. दगडफेकीत पोलिसासह पाच ते सहाजण जखमी झाले आहे. या दरम्यान, पोलिस वाहनावरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, शेंदुर्णीतील एका व्यायामशाळेत बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही युवकांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर दोन गटातील हाणामारीत झाले. एकमेकांवर दगड व विटा फेकण्यात आल्या. काही तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन दुचाकींची तोडफोड केली. पोलिस पथक काही क्षणातच या भागात दाखल झाले. यावेळी पोलिस वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात एका पोलिसासह दोन्ही गटातील पाच ते सहाजण जखमी झाले आहेत.
    घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक भरत दाते, गणेश सुस्ते आदींनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पाचोरा येथील पोलिस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. खबरदारी म्हणून चाळीसगाव, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, जामनेर, जळगाव येथून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, रात्री ११:३० वाजता पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शेंदुर्णीत घटनास्थळाची पाहणी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.