धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वराड येथील शेतात गेलेल्या येथील बालू बाबूराव भिल (६०) या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली. बालू भिल हे सकाळी साडेआठ वाजता असता गेले होते. यानंतर त्यांची पत्नी सुनंदाबाई या डबा घेऊन शेतात शेतात पोहोचल्या असता बालू भिल हे विहिरीजवळ पडलेले आढळले. हे दृश्य पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. हा आवाज ऐकून जवळच असलेले विकास पाटील हे घटनास्थळी धावत आले. गावातून कपील पाटील यांचे वाहन बोलावून बालू यांना धरणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
बालू हे पाणी भरण्यासाठी शेतात गेले होते. तेथे बिघाड झाल्याने त्यांनी मोटारीची वायर तोंडामध्ये धरून तोडण्याचा प्रयत्न केला व तितक्यातच वीजप्रवाह सुरू झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत बालू यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


