Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विरोधक तुमच्यासोबत स्पर्धा करायला बघतील
    राशीभविष्य

    विरोधक तुमच्यासोबत स्पर्धा करायला बघतील

    editor deskBy editor deskJuly 18, 2024No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मेष
    आजचा तुमचा दिवस अत्यंत सकारात्मक राहणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. विरोधक तुमच्यासोबत स्पर्धा करायला बघतील, अशावेळी विचलीत होऊ नका. काही लोकांना बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात उच्चपदावर जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. पण घाईत निर्णय घेऊ नका.

    वृषभ
    जुन्या मित्राची भेट होईल. कार्यक्षेत्रात तुमचं बौद्धिक कौशल्या पाहून सर्वच थक्क होतील. व्यापारात फायदा होईल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या महत्त्वकांक्षी योजनेत बदल करावा लागणार आहे. आईवडिलांसोबत वेळ घालवाल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस बरा नाही. प्रिय व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने तुमची धावपळ होणार आहे. नियमित योगा आणि प्राणायाम करा.

    मिथुन
    आजपासून तुम्ही बंधनमुक्त व्हाल. एखाद्या जुन्या वादातून सुटका होईल. क्रीडा क्षेत्रात लौकीक मिळवाल. राजकीय क्षेत्रातील लोकांना आज नव्या पदाची संधी मिळेल. आजपासून तुमचं नवं राजकीय करिअर सुरू होईल. महत्त्वाची जबाबदारी पार पाडाल. नोकरीत बॉसचं सानिध्य मिळेल. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. कृषी संबंधित गोष्टीत सरकारी मदत मिळेल. व्यापार क्षेत्रात नोकरांच्या कठोर मेहनतीमुळे आर्थिक फायदा होईल. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय कौटुंबिक वाद दूर होतील. विवाह इच्छुकांना आता दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही, मनासारखा जोडीदार मिळेल.

    कर्क
    कार्यक्षेत्रात नवीन मित्र मिळतील. नोकरीत वाहन सुख मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. बौद्धिक कार्यात यश मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर येईल. आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. वाहन, घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार आहे. दाम्पत्य जीवनात जीवनसाथीचा संशय दूर होईल. कुटुंबात सुख शांती लाभेल. इष्ट देवतेची पूजा केल्याने मनाला समाधान मिळेल.

    सिंह
    आज आळशीपणा जाणवेल. सुस्ती येईल. नोकरीत व्यवसायात सहकारी तुमच्याविरोधात षडयंत्र रचण्याची शक्यता आहे, त्यामुळे गोडबोल्या सहकाऱ्यांपासून सावध राहा. व्यापारात अधिक धोका पत्करू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवासात अपरिचित व्यक्तीवर भरवसा ठेवू नका. नाही तर किमती वस्तूंची चोरी होऊ शकते. राजकारणात विरोधकांचा जोर आणि प्रभाव पाहून खच्चीकरण होईल.

    कन्या
    आज वैवाहिक जीवनात खटके उडतील. कार्यक्षेत्रात भिन्न लिंगी व्यक्तीकडून भाव न मिळाल्याने मन खिन्न होईल. त्यामुळे भावनांना आवर घाला, नाही तर काम खराब होईल. बॉसचा राग ओढवून घ्याल. कोर्टकचेरीच्या प्रकरणाचा आज निकाल लागू शकतो. व्यापार आणि कुटुंबात जीभेवर नियंत्रण ठेवा. उद्योगात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून नका. दारू पिऊन वाहन चालवू नका, अन्यथा बाराच्या भावात जाल. गावाला जाण्याचा योग आहे. शेतीसंबंधित कामे मार्गी लावाल.

    तुळ
    कार्यक्षेत्रात घाईगडबडीत मोठा निर्णय घेऊ नका. कार्यस्थळी चोरी होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवहाराने सर्वांची मने प्रसन्न कराल. समाजात प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत होईल. संपत्तीवरून वाद होतील. धार्मिक कार्याकडे ओढा वाढेल. प्रेम विवाह होण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीचा संदेश येईल. परदेशातून पाहुणे येतील. कुटुंबातील एखाद्या लग्न सोहळ्यात सहभागी व्हाल. आरोग्याची तक्रार जाणवेल.

    वृश्चिक
    नोकरीच्या ठिकाणी तणाव निर्माण होईल. त्यामुळे टेन्शन वाढेल. आज आमदनी चांगली होण्याची शक्यता आहे. जमा पूंजीमध्ये वाढ होईल. एखादं महत्त्वाचं काम मार्गी लागेल. आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक करा. तुमचं आर्थिक बजेट व्यवस्थित ठेवा. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा प्रयत्न कराल. प्रेमप्रकरणाच्या अफवा उडतील. पण एकमेकांवर विश्वास राहिल्याने नात्यात कटुता येणार नाही. दाम्पत्य जीवनात वादळे येतील. त्यामुळे दोन पावलं मागे राहा. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील.

    धनु
    एखादं महत्त्वाचं काम मार्गी लागण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या मार्गी लागतील. समाजात मान सन्मान वाढेल. पदोन्नतीचा लाभ मिळेल. वरिष्ठांची मर्जी बसेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतील. तुम्हाला आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्लान तयार करावे लागतील. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. प्रेमप्रकरणातील समस्या दूर होतील. परस्पर सोहार्द वाढेल. प्रेम विवाहाची योजना मार्गी लागेल. दूर देशातील सहकाऱ्याकडून प्रेमाचा प्रस्ताव येऊ शकतो. दाम्पत्य जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप वाढू शकतो.

    मकर
    आजचा दिवस सुख आणि उन्नतीचा असणार आहे. दूरच्या प्रवासाचा योग आहे. धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. व्यवसायात नवीन संधी मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. प्रेमप्रकरणात किंमती भेटवस्तू किंवा पैसा मिळू शकतो. अविवाहीत लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकंवर काढतील. मानसिक तणाव वाढेल. पत्नीची खंबीर साथ मिळेल. शेजाऱ्यांकडून मोठी मदत मिळेल.

    कुंभ
    कला आणि अभिनयाच्या क्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढवून देणारा आजचा दिवस आहे. अचानक धन लाभ होईल. व्यापारातील स्थिती सुधारण्यासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. वाडवडिलांची संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. बहिणीला खास गिफ्ट देण्याचा विचार कराल. तुमच्या जुन्या शाळेला भेट देण्याचा योग आहे. जुने मित्र भेटण्याचाही योग आहे. पिकनिकला जाण्याचा प्लान कराल. वाहन खरेदीचा योग आहे. धार्मिक कार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे.

    मीन
    आजचा दिवस संघर्ष मुक्त असाच ठरणारा आहे. एखादं कार्य होता होता राहील. कुणाच्याही सांगण्यावरून निर्णय घेऊ नका. तुमच्या विवेकबुद्धीला स्मरूनच निर्णय घ्या. सामाजिक कार्यात प्रगती कराल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. आईवडिलांना भेटून आनंद वाटेल. आरोग्याची काळजी घ्या. पावसाळी आजारांनी बेजार व्हाल. मैत्रिणीची खूप मदत होईल. गावाकडे जाण्याचा योग आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे एक आनंददायी वातावरण निर्माण होणार !

    December 2, 2025

    इतरांच्या नकारात्मक टिप्पण्यांमुळे मनःस्थिती बिघडू देऊ नका.

    December 1, 2025

    ऑफिसमधील कामावर लक्ष केंद्रित करा, नाहीतर संधीसाधू लोकं गैरफायदा घेतील.

    November 30, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.