Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आजारी असतानाही आ.शहाजीबापू पाटील विधीमंडळात दाखल
    राजकारण

    आजारी असतानाही आ.शहाजीबापू पाटील विधीमंडळात दाखल

    editor deskBy editor deskJuly 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजारी असतानाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल झाले.

    सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नुकतेच ते बरे होऊन सांगोला तालुक्यातील आपल्या चिकमहूद या गावी आले होते. दरम्यान, विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आमदार शहाजीबापू पाटील गुरुवारीच मुंबईला आले आहेत. सध्या आमदार शहाजीबापू पाटील यांची तब्येत ठणठणीत असून ते रात्री आमदार निवासात मुक्कामाला होते.

    शुक्रवारी सकाळी आमदार शहाजीबापू पाटील हे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल झाले आणि त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केले. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या तब्येतीबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शहाजीबापूंची तब्येत ठणठणीत आहे. जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सोमवार १५ जुलै पासून आमदार शहाजीबापू पाटील हे आपल्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती शहाजीबापूंचे विश्वासू सहकारी माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ यांनी स्पष्ट केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.