Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : राज्यात येणार शिवरायांची वाघनखे
    राजकारण

    मोठी बातमी : राज्यात येणार शिवरायांची वाघनखे

    editor deskBy editor deskJuly 11, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात मोठ्या घोषणा करण्यात येत असतांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.

    मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, 19 जुलैला छत्रपती शिवरायांची वाघनखे साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचे आता राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी हे निवेदन दिले आहे.
    ”अनेक शिवभक्तांची मागणी होती की अफजलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवावे. 5 नोव्हेंबर 2022 रोजी या दिवशी ते हटवण्याचा निर्णय झाला. 10 नोव्हेंबर रोजी ते अतिक्रमण हटवले. त्यानंतर शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली. आपण त्यासंदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला. ती वाघनघं शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला. त्यांचे उत्तर आले. 1825 रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखं ठेवली आहेत. त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली”, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

    पुढे बोलतांना मुनगंटीवार म्हणाले, ”आम्ही माहिती घेतली की यासंदर्भात जगात इतरत्र कुठे काही उपलब्ध आहे का? इतर ठिकाणच्या पुराव्यांमध्येही माहिती देण्यात आली आहे. ही वाघनखं लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. 1875 व 1896 साली ही प्रदर्शनं भरवण्यात आली. त्यासंदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रांतही बातम्या आल्या. त्यानुसार ही वाघनखं त्या संग्रहालयात असल्याचे सांगण्यात आले. आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखं दर्शनासाठी देऊ असे सांगितले. पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर तीन वर्षांसाठी वाघनखं आपल्याकडे राहतील असा निर्णय झाला”, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नवीन बायपासवर पहाटेचा भीषण अपघात; सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

    March 2, 2026

    मोदींच्या नेतृत्वावर टीका थांबवा; राऊतांनी नाक खुपसू नये – नवनाथ बन यांचा इशारा

    March 1, 2026

    पतीच्या विरहात पत्नीचा मृत्यू; एकाच सरणावर अंत्यसंस्कार

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.