Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचार
    क्राईम

    चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला अत्याचार

    editor deskBy editor deskJuly 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    २०२३ मध्ये दिवाळीच्या नंतर एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेटचे आमिष देऊन अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. अत्याचार केलेल्या आरोपीचा साक्षीदार मित्राने देखील पिडीतेसोबत झालेला अत्याचार सगळ्यांना सांगून देईल असे सांगून धमकावत पिडीतेवर शेतशिवारात नेऊन अल्पवयीन मुलीवर पुन्हा अत्याचार केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश मधील बडवाणी जिल्ह्यातील १४ वर्षीय मुलगी परिवारासह धरणगाव तालुक्यातील एका शेतात वास्तव्याला आहे. आरोपी प्रवीण छत्र्या बारेला (रा. कानळदा ता.जळगाव) याने सन २०२३ मध्ये दिवाळीनंतर ४ ते ५ दिवसांनी तसेच जानेवारी २०२४ दरम्यान अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दिले. त्यानंतर धरणगाव तालुक्यातील एका शिवारात नेऊन अत्याचार केले. तसेच पीडित मुलीला व तिच्या आई वडिलांना जीवे ठार मारून देण्याची धमकी दिली. प्रवीण बारेला हा पीडित मुलीशी शारीरिक संबंध करीत असल्याचे पाहून दुसरा आरोपी पन्नालाल मराठे याने देखील पीडित अल्पवयीन मुलीला एकांतात गाठून प्रवीण बारेला आणि तुझ्या झालेल्या शारीरीक संबंधाबाबत सर्वांना सांगून देईल अशी धमकी दिली.

    त्यानंतर पन्नालाल मराठे याने देखील अल्पवयीन मुलीला शेत शिवारात अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने तिच्या आईला घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. मुलगी व आईच्या फिर्यादीावरून आरोपी प्रवीण बरेला आणि पन्नालाल मराठे यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पन्नालाल मराठे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनावणे करीत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026

    भडगाव हादरले : मुलांना वाचवताना नदीत उडी; तरुण-तरुणीचा दुर्दैवी अंत !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.