Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या
    जळगाव

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या

    editor deskBy editor deskJuly 8, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड  : प्रतिनिधी

    गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा मानली जाते. लोकमान्य टिळकांनी राष्ट्र जागृती आणि समाजातील एकोपा वाढवा यासाठी ही परंपरा सुरू केली. पावसाळा सुरू झाला की सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात परंतु गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गणेश मुर्ती घडविण्यासाठी मूर्तिकार सात आठ महिने अगोदर पासुन मेहनत घेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड येथील संतोष मंगळकर, विनोद मायकर, समाधान मंगळकर यांच्या गणेश मुर्ती घडविण्याच्या कारखान्याला भेट दिली आणि मुर्तिकारांशी संवाद साधुन त्यांच्या कले विषयी आणि या व्यवसायातील समस्यां विषयी जाणून घेतले.

    यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या, गणेश मुर्तिकारांची रोजी-रोटी या व्यवसायावरच अवलंबून आहे. वर्षातले सहा-सात महिने गणेशाच्या मूर्ती भक्तिभावाने घडवायच्या आणि त्यावर मिळणार्‍या पैशातून वर्षभर प्रपंचाचा गाडा चालवायचा. असा हा व्यवसाय आहे.वाढत्या महागाईचा फटका या उद्योगाला सुद्धा बसत आहे मुर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने मूर्तीच्या किमती वाढल्याचे दिसून येते हा सिझनल धंदा आहे. वर्षभर मूर्ती घरात ठेवून जतन करणेही अवघड असते.परंतु गणेशाच्या कृपेने आणि श्रद्धेने हे परिवार अनेक वर्षांपासून हा उद्योग करत आहेत.

    या व्यावसायिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करेल गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांकडून रेखीव सुबक आकर्षक तसेच योग्य रंगसंगतीचा वापर करून गणेश मूर्ति तयार केल्या जात आहे. मुळात गणपतीला त्याचे स्वत:चे रूप आहे, निरागस भाव हा गणपतीच्या मूर्तीचा गाभा आहे. पूर्वी सिंहासनावर, चौरंगावर बसलेल्या, मुकुट घातलेल्या मूर्ती तयार होत. पण आता ‘मागणी तसा पुरवठा’ यानुसार मासे, हत्ती, घोडे यावर आरुढ असलेल्या, बालगणेशाच्या, अगदी सायकल चालवणाऱ्या गोंडस मूर्तींही तयार केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

    आजकाल वेगवेगळ्या रूपातील कलात्मक मूर्ती बनवण्याची मागणी वाढली आहे. अशावेळी गणेशाचे मुळ रूप आणि निरागस भाव कायम ठेवून वेगवेगळ्या स्वरूपाची मुर्ती बनवताना मूर्तिकाराचे सारे कसब गणेशमूर्तीत प्रतिबिंबित होते कलाकार हा जीव ओतून मूर्ती मध्ये सजीवभाव आणल्याचा प्रयत्न करत असतो गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते परंतु गणेशाला घडवणाऱ्या मूर्तिकारांच्या आयुष्यात अनेक विघ्न आहेत. शासन पर्यावरपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना करण्याचे आवाहन करते हे योग्यही आहे परंतु शाडू माती ही माती गुजरातच्या नर्मदा खोऱ्यातून आणली जाते. परंतु शाडू मातीचा पुरवठा होत नसल्याने प्लास्टर ऑफ पॅरिस चा वापर वाढला आहे

    शासनाने मूर्तिकारांना योग्य भावात शाडू मातीचा पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून प्लास्टर ऑफ पॅरिस चा वापर कमी होईल शासनाने यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे त्यांना लागणाऱ्या कच्चा मालावरील करात सुट द्यावी व त्यांच्यासाठी राज्य शासनाने वेगळी योजना आखावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. यावेळी रामदास पाटील, कैलास चौधरी,विजय चौधरी,नगरसेवक गटनेता जफर शेख, मुजम्मीला शाह, नईम खान बागवान, लतीफ शेख, प्रदीप बडगुजर, शाम पाटील, किरण वंजारी, फिला राजपुत उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026

    सलमान खानचा आर्मी लूक व्हायरल; ‘मातृभूमी’ गाण्याने पेटवली देशभक्तीची भावना

    January 24, 2026

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.