Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विषारी औषध घेतल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    विषारी औषध घेतल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskJuly 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील किनोद येथील ३० वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेतले होते. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवार ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाळ नारायण सपकाळे (वय-३०) रा. किनोद ता.जि. जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, गोपाल सपकाळे हा आई पत्नी दोन मुलांसह विनोद गावात वास्तव्याला होता. शेती व मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवारी २ जुलै रोजी त्याने दुपारी शेतात असताना विषारी औषध सेवन केले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली होती. नातेवाईकांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत वैद्यकीय अधिकारी सुशांत निकुंभ यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात आई उर्मिला, पत्नी माधुरी, एक भाऊ, दोन मुलं आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    स्वातंत्र्य चौकात खळबळ; कॅन्टींगजवळील स्टोअर रूमला आग !

    April 27, 2026

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.