Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सार्वजनिक ठिकाणी ओढला गांजा ; पोलिसांनी केली कारवाई
    क्राईम

    सार्वजनिक ठिकाणी ओढला गांजा ; पोलिसांनी केली कारवाई

    editor deskBy editor deskJune 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील सार्वजनिक ठिकाणी गांजा सारखे आमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. सात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये सात जणांविरुद्ध जिल्हापेठ, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत असे कि, शहरातील सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे गांजा ओढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शहरातील मेहरुण तलाव परिसरातील मनपाच्या जलतरण तलावच्या भिंतीच्या आडोशाला, मेहरुणच्या बगिच्याजवळील विहरीजवळ, मेहरुणच्या बगिच्यात, अजय कॉलनीतील एमएसीबी सब स्टेशनच्या मागे, बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस, आंबेडकर बगीच्याच्या भिंतीच्या आडोशाला व शहरातील नवीन बस स्थानकाच्या मागील बाजूस गांजा ओढणाऱ्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित शेख मशरुफ अब्दुल कादीर (वय ४२, रा. गवळीवाडा), वसीम शेख तलत मेहमुद (वय ३९, रा. काट्याफाईल), फय्याज शेख समशू (वय ३६, रा. पंचशिल नगर तांबापुरा), किरण भगवान सकट (वय ३१, रा. हरिविठ्ठल नगर), योगेश रमेश बाविस्कर (वय ३४, रा. हरिविठ्ठल नगर), गणेश शालिग्राम धांडे (वय ४१, रा. मुक्ताईनगर), अनिल रघुनाथ राणे (वय ६२, रा. भिकमचंद नगर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.