Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलीला घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेला विहिरीत फेकले
    क्राईम

    मुलीला घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेला विहिरीत फेकले

    editor deskBy editor deskJune 25, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मुलीला घेण्यासाठी शाळेत गेलेल्या विवाहितेला अज्ञात महिलेने गुंगवून शिरसोली येथे नेत तिला विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी २५ जून रोजी सकाळी उघडकीला आला आहे. सुदैवाने विवाहिता जिवंत असून तिला ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू असून पोलीस कर्मचारी कसून चौकशी करत आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नेहरूनगर परिसरातील दीपिका दीपक पाटील (वय २६) असे सदर महिलेचे नाव आहे. दिपीका ह्या नेहरूनगर येथे पती, मुलांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २४ जून रोजी दुपारी एक वाजेनंतर त्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना रस्त्यावर एक अनोळखी महिला भेटली. त्या महिलेने विवाहितेच्या डोक्यावरून हात फिरवला व तिची शुद्ध हरपली. त्यानंतर तास-दीड तासाने विवाहितेला गुंगीत असताना जाणवले की, आपण पाण्यात असून एका विहिरीत असल्याचे समजले. मात्र गुंगी असल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती.

    सोमवारची पूर्ण रात्र विवाहितेने विहिरीत काढली. दुसरीकडे शाळेत मुलीचे पालक तिला घेण्यासाठी आले नाही म्हणून शिक्षकांनी मुलीच्या वडिलांना फोन केला. तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की, तिची आई तिला शाळेत घ्यायला गेली आहे. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी काकूला पत्नीला पाहण्यासाठी व मुलीला घेण्यासाठी पाठवले. दिवसभर व रात्रभर सदर महिलेचा परिवार शोध घेत होते. दरम्यान शिरसोली येथे मुख्तार मुनाफ कुरेशी हे त्यांच्या आकाशवाणी जवळील शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना सदरहू महिला ही विहिरीत बसलेली दिसून आली.

    त्यांनी तात्काळ पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले. गावातीलच एका तरुणाने तिला ओळखले. त्याच्या मित्राची ती पत्नी असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला कळवले. त्यानंतर सदर महिलेला शासकीय वैद्यकीय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिच्या नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमागचा उद्देश काय याचा एमआयडीसी पोलीस स्टेशन शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्रीचा वाद ठरला जीवघेणा; भुसावळात ४२ वर्षीय तरुणाचा खून !

    February 28, 2026

    भल्या पहाटे पोलिसांची कारवाई : बांभोरीत ४० वाहनांवर धाडसी कारवाई !

    February 28, 2026

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.