Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात दहावीच्या मुलीने संपविली जीवनयात्रा
    क्राईम

    जळगावात दहावीच्या मुलीने संपविली जीवनयात्रा

    editor deskBy editor deskJune 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव वडील बाहेर गेलेले असताना निशा मनोज परदेशी (१६, रा. तळेले कॉलनी) या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, २३ जून रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम कंपनीत सुरक्षा रक्षक असलेले मनोज परदेशी हे पत्नी, दोन मुलींसह तळेले कॉलनीत राहतात, रविवारी सकाळी रुग्णालयात असलेल्या नातेवाइकांसाठी ते चहा घेऊन गेले होते. त्या वेळी आई व लहान बहीण घरी असताना निशा परदेशी हिने घरात गळफास घेतला. मुलीने गळफास घेतल्याचे आईला दिसताच आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत मुलीच्या पश्चात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026

    मध्यरात्रीचा वाद ठरला जीवघेणा; भुसावळात ४२ वर्षीय तरुणाचा खून !

    February 28, 2026

    भल्या पहाटे पोलिसांची कारवाई : बांभोरीत ४० वाहनांवर धाडसी कारवाई !

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.