Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अवजड कंटेनर रस्त्यावर झाला ‘आडवा’
    क्राईम

    अवजड कंटेनर रस्त्यावर झाला ‘आडवा’

    editor deskBy editor deskJune 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अवजड कंटेनरचा पुढील भाग खाली उतरून हा कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ही घटना शिरसोली ते वावडदा दरम्यान गुरुवार, २० जून रोजी रात्री नऊ वाजता घडली. रात्री एक वाजता क्रेन आल्यावर कंटेनरला हटविण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथून एक कंटेनर (क्र. एमएच १९ झेड ४२०७) मुंबईकडे येथे जात होता. शिरसोली ते वावडदा दरम्यान हॉटेल फौजीजवळ चालकाला रस्त्यावरचा अंदाज आला नाही. त्यामुळे कंटेनर रस्त्याच्या खाली उतरला. पुढील चाक रस्त्याच्या खाली तर मागील भाग हा महामार्गावरच अडकला होता. त्यामुळे जाण्या-येण्याचा मार्ग बंद पडल्याने वाहतूक खोळंबली. सुदैवाने घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही अथवा जीवितहानी झालेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026

    मध्यरात्रीचा वाद ठरला जीवघेणा; भुसावळात ४२ वर्षीय तरुणाचा खून !

    February 28, 2026

    भल्या पहाटे पोलिसांची कारवाई : बांभोरीत ४० वाहनांवर धाडसी कारवाई !

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.