Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पैशांच्या वादातून जळगावात दोन गट भिडले
    क्राईम

    पैशांच्या वादातून जळगावात दोन गट भिडले

    editor deskBy editor deskJune 20, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पैशांच्या कारणावरु न वाद होवून दोन गट एकमेकांना भिडल्याची घटना दि. १७ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात घडली. यामध्ये दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठल नगरातील अक्षय रुपेश साळुंखे (वय २२) हा तरुण मजूरी करतो. दि. १७ जून रोजी त्याच परिसरातील नितीन आनंदा भोई, जितू आनंदा भोई, आनंदा भोई या तिघांनी अक्षय साळुंखे याला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात लाकडी दांडका मारुन गंभीर दुखापत केली. याप्रकरणी जखमी अक्षय याने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. तर दुसऱ्या गटातील नितीन आनंदा भोई यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आकाश रुपेश साळुंखे याने नितीन भोई याला फोन माझे पैसे मला परत दे असे बोलून त्याला भामरे टेन्ट हाऊस जवळ भेटायला ये असे सांगितले. त्यानुासार नितीन हा त्याठिकाणी गेला असता, आकाश रुपेश साळुंखे, अक्षय रुपेश साळुंखे, रु पेश साळुखे (तिघ राहरिविठ्ठलनगर) यांनी नितीन भोई याला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच आकाश याने त्याच्या हातातील सळई नितीनच्या डोक्यात मास्ना त्याला गंभीर जखमी केले. तसेच तुला जास्त झाले आहे, तुला मारुन टाकीन अशी धमकी देखील दिली. नितीन भोई यांनी लागलीच रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.