Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » टेलिग्राम व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरुणाची १२ लाखाची फसवणूक
    क्राईम

    टेलिग्राम व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरुणाची १२ लाखाची फसवणूक

    editor deskBy editor deskJune 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    टेलिग्राम व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देऊन त्या बदल्यात नफ्याचे आमिष दाखवत विशाल रामराव सूर्यवंशी (२७, रा. चाळीसगाव) यांची १२ लाख ७९ हजार ३७५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना १० मे ते १८ जून दरम्यान घडली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, खासगी नोकरी करणारे विशाल सूर्यवंशी यांना १० मे रोजी टेलिग्राम तसेच व्हॉट्सअॅपवर मेसेज करून टास्क पूर्ण करण्यास सांगितले. यात विशाल यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन रक्कम स्वीकारली. यात त्यांना एक लाख ५३ हजार ३२ रुपये परतावा दिला. त्यात विश्वास संपादन करून रक्कम स्वीकारतच राहिले. अशा प्रकारे एकूण १४ लाख ३२ हजार ४०७ रुपये स्वीकारले. त्यातील केवळ एक लाख ५३ हजार ३२ रुपयेच परत मिळाल्याने विशाल यांची १२ लाख ७९ हजार ३७५ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मंगळवार, १८ जून रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    हॉकर्सच्या प्रश्नासाठी उपमहापौर मनोज चौधरी मैदानात; खाऊ गल्लीची प्रत्यक्ष पाहणी!

    August 27, 2026

    आधी मुलगा बुडाला… वाचवायला गेलेले वडीलही बुडाले! अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

    August 27, 2026

    पोलिसांचा ‘एमपीडीए’चा धडाका ; चाळीसगावच्या वाजिद खानची नागपूर कारागृहात रवानगी !

    August 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.